तिसऱ्या दिवशीच भारताचा पराभव; दक्षिण आफ्रिकेची कोलकात्यात दणदणीत विजयाने मालिकेत 1-0 ने आघाडीकोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 30 धावांनी पराभव केला.
भारताने पहिल्या डावात 30 धावांची आघाडी घेतली होती, परंतु दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीच्या दमदार कामगिरीने पुनरागमन करत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
बावुमावर दक्षिण आफ्रिकेची आशादुसऱ्या दिवसाअखेर बावुमा 29 धावांवर नाबाद आहेत. दक्षिण आफ्रिकेची एकूण आघाडी 63 धावांची आहे.आज बावुमा जास्तीत जास्त वेळ क्रीजवर थांबले तर दक्षिण आफ्रिकेच्या आशा टिकून राहू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना शेवटच्या फळीतल्या फलंदाजांचा साथ मिळणे खूप महत्त्वाचं ठरेल.
भारताची दुसऱ्या डावातील गोलंदाजी दुसऱ्या डावात भारतासाठी सर्वात प्रभावी गोलंदाज ठरत आहेत रवींद्र जडेजा. त्याने दुसऱ्या दिवसाअखेरपर्यंत 13 षटकांत 29 धावा देत 4 विकेट घेतल्या. त्याशिवाय कुलदीप यादवनेही दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत 2 विकेट घेतल्या आहेत. एकूणच पाहता, सामना तिसऱ्या दिवसातच भारताच्या बाजूने झुकताना दिसतोय.

0 Comments