: मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ,


 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी राज्य सरकारनं ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे आणि पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातल्या महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांकडे जमा करावी, असं आवाहन महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यासाठीची अंतिम मुदत उद्या संपत आहे. परंतु अजूनही अनेक महिलांची केवायसी बाकी आहे. अशातच सरकार ई-केवायसीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

मुंबई: राज्य सरकारच्या ' मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या योजनेसाठी लाभार्थी महिलांना केवायसी करण्याची अंतिम मुदत उद्या 18 नोव्हेंबर रोजी संपत आहे. असं असलं तरी अद्याप 1 कोटी 10 लाख महिलांकडून केवायसी करणे अजूनही बाकी आहे. अशातच केवायसी बाकी असणाऱ्या महिलांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे महिलांची नाराजी टाळण्यासाठी सरकार ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेत कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचे लाभ बंद होणार आहेत, तसेच आधार आणि मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे. पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांसाठी केवायसी प्रक्रियेत बदल केला जाणार आहे. या योजनेत सुरुवातीला 2 कोटी 9 लाख महिलांनी अर्ज केले होते, त्यापैकी निकषांमध्ये न बसणाऱ्या सुमारे 50 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.


कशी करावी ई-केवायसी प्रक्रिया?


मोबाईलवरून ई-केवायसी (eKYC) करणे आता सोपं झालं आहे. लाडकी बहीण योजनेसारख्या सरकारी सेवांसाठी तुम्ही घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. लाडकी बहीण योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवर जावे लागेल. तिथे 'ई-केवायसी' हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) टाकून पडताळणी करा.


Post a Comment

0 Comments