महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी

 महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सुरू केली आहे. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 ची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते.ही मदत पुढेही मिळत राहण्यासाठी e-KYC करणे खूप महत्त्वाचे आहे. e-KYC म्हणजे तुमचा आधार आणि बँक खाते तपासून सरकार तुमची ओळख खात्री करते.या लेखात आपण बघू — Ladki Bahin Yojana e-KYC ऑनलाइन कशी करायची, प्रक्रिया करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

eKYC Last Date

18 नोव्हेंबर 2025


लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी करावी?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी अधिकृत ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc वेबपेज वर जा.त्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक आणि कॅप्टचा दर्ज करा शेवटी आधार प्रमाणीकरणासाठी संमती साठी मी सहमत आहे याला टिक मार्क करून ओटीपी पाठवा बटनावर क्लिक करा.आधार शी लिंक असलेल्या मोबाइल वर OTP प्राप्त होईल तो दर्ज करून सबमिट करा

त्यानंतर वडिलांचा/पतीचा आधार क्रमांक आणि कॅप्टचा दर्ज करा शेवटी आधार प्रमाणीकरणासाठी संमती साठी मी सहमत आहे याला टिक मार्क करून ओटीपी पाठवा बटनावर क्लिक करा.

आधार शी लिंक असलेल्या मोबाइल वर OTP प्राप्त होईल तो दर्ज करून सबमिट करा.

आता जात प्रवर्ग निवडा त्यानंतर उपरोक्त अ.क्रं. १ आणि २ निट वाचून त्यात योग्य तो पर्याय निवडा. शेवटी टिक मार्क करून सबमिट करा..




लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी खूप उपयोगी योजना आहे. या योजनेमुळे पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 ची मदत मिळते.

पण ही रक्कम पुढेही मिळत राहण्यासाठी e-KYC करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि तुम्ही ती ऑनलाइन घरबसल्या करू शकता.

फक्त तुमचा आधार नंबर, मोबाइल नंबर आणि थोडी माहिती लागते. म्हणून वेळ न घालवता आजच तुमची e-KYC पूर्ण करा, जेणेकरून तुमचा हक्काचा पैसा वेळेवर मिळेल.










Post a Comment

0 Comments