खाली तिची सविस्तर माहिती दिली आहे 👇
योजनेचा उद्देश:
उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना राहणे, अन्न, प्रवास आणि इतर
खर्चासाठी आर्थिक मदत देणे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि गरिब पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना
शिक्षण सुरू ठेवता यावे हा मुख्य हेतू आहे.
लाभार्थी कोण?
1. महाराष्ट्रातील SC आणि OBC प्रवर्गातील विद्यार्थी.
2. ज्यांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा
कमी आहे.
3. विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण (उदा. 11वी ते पदवी,
पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रम) घेत आहेत.
आर्थिक लाभ:
विद्यार्थ्यांना महिना ₹ 42000 पर्यंत मदत (शहरानुसार बदलते) दिली
जाते. ही मदत विद्यार्थ्यांच्या राहण्याचा, अन्नाचा आणि इतर दैनंदिन खर्च भागवण्यासाठी
असते.
नविन अर्जासाठी :-
विद्यार्थी माहिती.
बँकेची माहिती
विद्यार्थ्याचे पासबुक
वरील नाव
राष्ट्रीयकृत बँकेचे नाव :
शाखा
खातेक्रमांक
IFSC code
अर्जदाराने अपलोड करावयाची कागदपत्रे
अर्जदाराचा फोटो
२ अर्जदाराची सही
३ जातीचा दाखला
४ आधार कार्डाची प्रत
५ बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.
६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.
८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट :
९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा :
१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC .
११ स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र :
१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती :
१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत :
१५ शपथपत्र / हमीपत्र :
१६ भाडे करारनामा :
अर्ज कसा करावा:
ऑनलाईन अर्ज https://hmas.mahait.org/
- या संकेतस्थळावर
करायचा असतो.
- “Social Justice and Special Assistance Department” अंतर्गत
Swadhar Yojana निवडून अर्ज भरावा.
ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स कॉपी जोडून कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे

0 Comments