राजस्थान रॉयल्समध्ये
पुनरागमन करताना रविंद्र जडेजाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे.
सुरुवातीच्या आयपीएल वर्षांत राजस्थानने दिलेला मोठा मंच आणि पहिल्या विजेतेपदाची
चव आजही त्याच्या मनात ताजी आहे. परत आल्यावर त्याने आपल्या भावना स्पष्टपणे
व्यक्त केल्या.
रवींद्र जडेजा म्हणाला,
"राजस्थान रॉयल्सने
मला माझं पहिलं व्यासपीठ दिलं आणि पहिला विजय दाखवला. इथं परत येणं माझ्यासाठी खूप
खास आहे. राजस्थान माझ्यासाठी केवळ एक संघ नाही, तर माझं घर आहे. इथेच मी
माझं पहिलं आयपीएल जिंकलं होतं आणि आता मला आशा आहे की सध्याच्या खेळाडूंसोबत आणखी
विजय मिळवू."
या वक्तव्यानंतर
राजस्थानच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे. अनुभवी जडेजा आणि तरुण
खेळाडूंच्या मिश्रणामुळे संघाला नव्या हंगामात अधिक स्थैर्य आणि आक्रमकता मिळेल, अशी
अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 Comments