धाराशिव जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान



  धाराशिव जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महायुती सरकारकडून जिल्ह्यासाठी भरीव मदत देण्यात येत आहे. जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक मदत मिळणार असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.


जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी जवळपास १०० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. उर्वरित मदतही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून, सरकारकडून तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.


#धाराशिव #अतिवृष्टी #पाऊस #शेतकरी #नुकसान #मदत #Dharashiv #Farmer #Rain #Relief #DevendraFadnavis #Mahayuti
 

Post a Comment

0 Comments