*धाराशिव नगरपरिषदेच्या निवडणुकांची चाहूल : प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीचे स्वप्निल भैय्या शिंगाडे चर्चेत!*
धाराशिव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांची चाहूल लागल्याने राजकीय वातावरणात हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टी BJP पक्षाकडून स्वप्निल भैय्या शिंगाडे यांचे नाव जोरदारपणे चर्चेत आहे.
स्वप्निल भैया हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांमध्ये ठोस जनसंपर्क निर्माण केला आहे. अलीकडेच त्यांनी आपल्या प्रभागात बॅनरबाजी आणि जनतेच्या प्रश्नांवर केलेल्या प्रभावी उपस्थितीमुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत.
त्यांच्या कार्यशैलीत सामाजिक बांधिलकीसोबतच तरुणांना प्रोत्साहन दिसून येते. त्यामुळेच ते आज “युवा व शिक्षित चेहरा” म्हणून नागरिकांमध्ये ओळखले जात आहेत.
त्यांच्या कामाचा ठसा प्रशासन आणि नागरिकांमध्ये उमटला असून, अनेक तरुण त्यांच्याभोवती एकवटले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक.1 मधून भारतीय जनता पार्टी BJP पक्षाकडून स्वप्निल भैय्या शिंगाडे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, स्वप्निल भैया शिंगाडे यांनी जेवढे लोकसंपर्क ठेवले आहेत आणि लोकांच्या अडचणींवर तत्परतेने मदत करतील, त्यामुळे त्यांच्याविषयी लोकांमध्ये विश्वास आणि अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.”

0 Comments