. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तब्बल ७५० कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आपल्या एकट्या जिल्ह्यासाठी मंजूर केली आहे

 

    

  आजवर जिल्ह्याच्या इतिहासात कधीच एवढी भरीव मदत नुकसान भरपाईपोटी मिळालेली नाही. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तब्बल ७५० कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आपल्या एकट्या जिल्ह्यासाठी मंजूर केली आहे. आत्तापर्यंत १०० कोटी रुपये जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या थेट खात्यात जमाही झाले आहेत.


जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेले नुकसान अभूतपूर्व आहे. त्यामुळे नुकसान भरपाईही अभूतपूर्वच असायला हवी असा आग्रह अगदी पहिल्या दिवसापासून आपण राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे केला होता. त्यांनीही अत्यंत गांभीर्याने विचार करून आपण केलेल्या सगळ्या मागण्यांना हिरवा कंदील देत धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. याउपरही आणखी काही विशेष उपाययोजना राबविण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरूच राहणार आहेत.


#धाराशिव #अतिवृष्टी #पाऊस #शेतकरी #अनुदान #मदत #Dharashiv #Rain #Farmer #Relief #DevendraFadnavis #Mahayuti

Post a Comment

0 Comments