श्री.दिनेश बंडगर आणि त्यांच्या शेकडो सहकारी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश

 


आदरणीय डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब यांचे जुने कार्यकर्ते, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष, उबाठा गटाचे नेते श्री.दत्ता बंडगर, उबाठाचे जिल्हा समन्वयक श्री.दिनेश बंडगर आणि त्यांच्या शेकडो सहकारी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.



 

यावेळी प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने सौ.लक्ष्मी दत्ता बंडगर, श्री.गुड्डू हैदर शेख, श्री.शिवसेना शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री.विजयकुमार कुलकर्णी, श्री.पाताळ देवकते, कल्याणी सम्राट माने, श्री.शकील तांबोळी, श्री.जावेद तांबोळी, श्री.विजय आवाड, श्री.अक्षय जाधव, श्री.अजय विंचुरे, श्री.आकाश तोडकरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे. प्रतिष्ठान भवन, भाजपा कार्यालय येथे संपन्न झालेल्या पक्ष प्रवेश समारंभात सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री.नितीन काळे, श्री.नेताजी पाटील, श्री.सुनील काकडे, श्री.संपतराव डोके, श्री.अभय इंगळे, श्री.नितीन भोसले, प्रा.चंद्रजीत जाधव, श्री.नितीन शेरखाने, श्री.इंद्रजित देवकते, श्री.विलास लोंढे, श्री.बापू पवार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments